Ad will apear here
Next
‘कृषी विज्ञान केंद्रांमध्ये गो-विज्ञान केंद्र स्थापन करणार’
राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे अध्यक्ष डॉ. वल्लभभाई कथिरिया यांची घोषणा
पुणे जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीच्या बैठक राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे अध्यक्ष डॉ. वल्लभभाई कथिरिया यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

पुणे : ‘देशातील कृषी विज्ञान केंद्रांमध्ये केंद्र शासनाच्या पुढाकारातून गो-कृषी विज्ञान केंद्रे स्थापन करण्यात येणार असून, गोशाळांना स्वावलंबी बनविण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची गरज आहे,’ असे मत राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे अध्यक्ष डॉ. वल्लभभाई कथिरिया यांनी पुण्यात व्यक्त केले.

राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे अध्यक्ष डॉ. वल्लभभाई कथिरिया
पुणे जिल्हा प्राणी-क्लेशप्रतिबंधक सोसायटीची बैठक गुरुवारी, २८ नोव्हेंबर २०१९ रोजी, राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे अध्यक्ष डॉ. वल्लभभाई कथिरिया यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, पशुसंवर्धन आयुक्त लक्ष्मीनारायण मिश्रा, उपायुक्त डॉ. बाकरेवान, डॉ. शिवाजी विधाते, डॉ. अनिल देशपांडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विवेक पाटील, सहायक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी, समितीचे सदस्य सुरेश रास्ते, संदीप नवले, नेहा पंचामिया आदी उपस्थित होते. डॉ. कथिरिया यांनी जिल्हा प्राणी क्लेष समितीचे सदस्य व पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांशी गोसंवर्धनासंदर्भात सविस्तर चर्चा केली. 

‘भारतीय संस्कृतीत गाईला पवित्र मानले जाते. गाईचे दूध, गोमूत्र यामध्ये औषधी गुणधर्म असतात. याशिवाय गाईच्या शेणाचा खत म्हणून वापर केला जातो. गाईच्या या सर्व गुणधर्मांमुळे तिचे संगोपन व्यवस्थित व्हावे यासाठी गोशाळांना स्वावलंबी करण्यावर भर देणे आवश्यक असून, आदर्श गोशाळांना पर्यंटन केंद्र बनविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत,’ असेही डॉ. कथिरिया यांनी नमूद केले.


‘कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून गोसंवर्धनासंदर्भात प्रशिक्षण व बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याकडे एक तरी गाय असावी, यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेणे अपेक्षित आहे,’ असेही त्यांनी सांगितले
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZPECG
Similar Posts
आंतरराष्ट्रीय विज्ञानपट महोत्सवात पुणेकर ‘कस्तुरी’च्या यशाचा दरवळ पुणे : दहावीत शिकणाऱ्या कस्तुरी कुलकर्णीने बनवलेल्या ‘सिंबायोसिस’ या लघुपटाला ‘इंटरनॅशनल सायन्स फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’मध्ये तृतीय पुरस्कार मिळाला आहे. कस्तुरी ‘बेरीज वजाबाकी’ या मराठी चित्रपटाची सहाय्यक दिग्दर्शकसुद्धा आहे.
सर्वांत मोठे कृषि प्रदर्शन ‘किसान’चे पुण्यात उद्घाटन पुणे : देशातील सर्वांत मोठे कृषी प्रदर्शन ‘किसान’चे पुण्यात बुधवारी, ११ डिसेंबर रोजी उद्घाटन झाले. दर वर्षीप्रमाणे या वर्षीदेखील प्रदर्शनाला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांच्या पहिल्या गटाच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
इला फाउंडेशनला आरबीएस अर्थ गार्डियन पुरस्कार पुणे : रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड अर्थात आरबीएस इंडिया कंपनीच्या वतीने नुकतेच यंदाच्या आरबीएस अर्थ हिरो पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये निसर्ग आणि पक्षी संवर्धन क्षेत्रासाठी दर्शवलेल्या बांधिलकीसाठी इला फाउंडेशनचा आरबीएस अर्थ गार्डियन पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
‘उच्च शिक्षणासाठी सामाजिक संस्थांचा हातभार महत्त्वाचा’ पुणे : ‘शेतीविषयक शिक्षणामध्ये नाविन्यपूर्ण बदल केले जात आहेत. सरकारनेही चांगल्या योजना निर्माण केल्या आहेत. शिवाय, आपल्याकडे बहुतांश विद्यार्थी मुख्य व्यवसाय शेती असलेल्या भागातून येतात. मात्र, आर्थिक पाठबळाच्या अभावामुळे त्यांना उच्च शिक्षण घेण्यात अडचणी येतात. अशावेळी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language